गावाची मतदार यादी मिळवा – फक्त 2 मिनिटांत

नमस्कार !!

भारतामध्ये मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं हक्क आणि कर्तव्य आहे. पण अनेक वेळा लोकांना आपलं नाव मतदान यादीत (Voter List) आहे की नाही, हे समजत नाही – आणि त्यामुळे ते मतदान करू शकत नाहीत.

आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या गावाची किंवा शहराची मतदान यादी फक्त २ मिनिटांत ऑनलाईन कशी पाहू शकता.

त्यासाठी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राची एक वेबसाईट आहे – वोटर्स डॉट ई सी आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन ( https://voters.eci.gov.in/download-eroll)

या वेबसाईटवर क्लिक केल्यावर तुम्हाला खालील पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स भरायच्या आहेत.

सर्वप्रथम, तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ (Assembly Constituency) निवडावा लागतो.

त्यानंतर, यादी कोणत्या भाषेत पाहायची हे निवडा – उदाहरणार्थ मराठी, हिंदी किंवा इंग्रजी. ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला कॅप्चा कोड (Captcha) दाखवला जाईल, तो अचूकपणे टाइप करावा लागतो. कधी कधी कॅप्चा नीट दिसत नसेल, तर तुम्ही तो “Refresh” करून नवीन कोड घेऊ शकता.

सर्व डिटेल्स भरल्यावर तुम्हाला त्या मतदारसंघातील सर्व गावांची नावे दिसतील. त्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या गावाचं नाव सिलेक्ट करून मतदान यादी डाऊनलोड करू शकता.

तुम्हाला हेही आवडेल: ब्लॅक बॉक्स: अपघातानंतरचा नि:शब्द साक्षीदार – Black Box

डाउनलोड झालेल्या मतदार यादी मध्ये आपण कोणाचे नाव त्या मतदार यादीतून वगळण्यात आले आहे तेही पाहू शकतो. तसेच नवीन नाव त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे का नाही तेही पाहू शकतो.

तर अशा प्रकारे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ची वोटर्स वेबसाईट चा वापर करून आपण मतदान यादी डाऊनलोड करू शकतो, तेही फक्त दोन मिनिटात .

तर मित्रांनो हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

धन्यवाद !!

एकवचनी: 1 विचार “गावाची मतदार यादी मिळवा – फक्त 2 मिनिटांत”

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top