12 एप्रिल 2025 भारतासाठी काळा दिवस होता असं म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही. त्या दिवशी अहमदाबाद विमानतळावरून एक विमान लंडनला जाण्यासाठी निघाले होते, ते टेक ऑफ करताच अवघ्या एक मिनिटात ते विमान एका मेडिकल कॉलेजच्या मेसवर क्रॅश झाले. यामध्ये दुर्दैवाने २५० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

तो स्पोट इतका भीषण होता की त्याच टेंपरेचर (Temprature) एक हजार डिग्रीसेल्सिअस पेक्षाही जास्त होते. त्यामुळे यामध्ये एक प्रवासी सोडता सर्व जणांचा मृत्यू झाला. तसेच ज्यावेळी इमारतीवर हे विमान क्रॅश झाले त्या इमारती मधील काही जणांचा ही मृत्यू झाल्याची बातमी आहे.
आता मात्र हा प्रश्न उपस्थित झालेला आहे की, हे विमान क्रॅश कसे झाले? त्या मागचे कारण काय ?
हेच जाणून घ्यायचं असेल तर ब्लॅक बॉक्स याच्याबद्दल माहिती असणे खूप महत्त्वाचा आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण ब्लॅक बॉक्स काय आहे ? ते काय काम करत? ते विमानामध्ये कोठे ठेवलेलं असतं ? तो ब्लॅक बॉक्स दिसायला कसा असतो याची माहिती घेणार आहोत.

विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेताना ब्लॅक बॉक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची ठरते. वैमानिकाने शेवटच्या सेकंदापर्यंत हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्याशी जो संपर्क साधलेला असतो त्याची सर्व रेकॉर्डिंग या ब्लॅक बॉक्स मधील व्हॉइस रेकॉर्डर मध्ये झालेली असते. यात Flight डेटा रेकॉर्डर (FDR) देखील असतो, त्यामुळे विमान अपघातग्रस्त होण्यापूर्वी कोणत्या उपकरणांचा वापर झाला हे देखील यातून समजते. त्यामुळे तांत्रिक विकारामुळे अपघात झाल्यास अपघाताचे नेमके कारण समजण्यास सोपे जाते.

ब्लॅक बॉक्स हे एक इलेक्ट्रॉनिक्स रेकॉर्डिंग डिवाइस आहे जे विमानामध्ये बसवलेलं असतं. हे डिवाइस विमानाच्या उड्डानाशि संबंधित माहिती व कॉकपिट मधील आवाज रेकॉर्ड करते .कॉकपिट हा विमानाचा असा भाग आहे जिथे पायलेट आणि सह पायलेट विमानाचे व्यवस्थापन करतात.
ब्लॅक बॉक्स टायटॅनियम (Titanium) धातूपासून बनवलेला असतो. तो रंगाने केसरी कलरचा असतो.
ब्लॅक बॉक्स हा इंधन विमानाचा वेग किती आहे ? किती उंचीवर आहे ? यासारख्या 80 तांत्रिक बाबींची माहिती गोळा करतो. हा ब्लॅक बॉक्स आग, पाणी यातही सुरक्षित राहू शकतो.
ब्लॅक बॉक्स कसा सापडतो?
ब्लॅक बॉक्समध्ये एक अल्ट्रासोनिक बीप असतो, जो ३० दिवसांपर्यंत पाण्यातही ध्वनी सिग्नल देतो.
त्यामुळे अपघात झाल्यानंतर शोधमोहिमेद्वारे त्याला पाण्याखालून किंवा मलब्यातून शोधलं जातं.
समुद्रात ब्लॅक बॉक्स 20000 ft खोलीतही सुरक्षित राहू शकतो तसेच तीन हजार चारशे अंश सेल्सिअस (3000°C) तापमान सहन करण्याची त्याची क्षमता आहे.
तुम्हाला हेही आवडेल: Rolex चे जनक हॅन्स विल्सडॉर्फ | मराठीत
या ब्लॅक बॉक्समध्ये मुख्य दोन यंत्रणा असतात.
एक म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर एफटीआर (FDR) – विमानाची गती विमानाची उंची त्याची दिशा तसेच इंजिनची स्थिती नियंत्रणाची हालचाल यासारखा डेटा एफटीआर रेकॉर्ड करतो.
ब्लॅक बॉक्समध्ये दुसरा पार्ट असतो तो म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सीव्हीआर (CVR). या सीव्हीआर चा उपयोग पायलट मधील संभाषण तसेच अलार्म चे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी केला जातो. इतर पार्श्वभूमीतील आवाज सुद्धा सीव्हीआर रेकॉर्ड करतो.

तर अशा प्रकारे FDR आणि CDR सतत माहिती रेकॉर्ड करत राहते आणि हे रेकॉर्डिंग काही तासापर्यंत साठवले जाऊ शकतात.
तर अशा प्रकारे ब्लॅक बॉक्स चा उपयोग विमान अपघातानंतर त्या मागचे कारण शोधण्यासाठी उपयुक्त ठरते तसेच सुरक्षा विश्लेषणासाठी ही डेटा उपलब्ध करून मिळतो. पायलट प्रशिक्षण असेल आणि एअरलाइन्स ऑपरेशन मध्येही सुधारणा करण्यासाठी ब्लॅक बॉक्सची मदत होते.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा ब्लॅक बॉक्स विमानात नेमका ठेवला कोठे जातो?
खरंतर हा ब्लॅक बॉक्स विमानात कुठेही ठेवला जाऊ शकला असता परंतु सहसा हा विमानाच्या मागच्या भागातच ठेवला जातो कारण अपघाताच्या वेळी विमानाचा मागचा भाग, पुढच्या भागाच्या तुलनेने सुरक्षित राहतो. त्यामुळे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्याची शक्यता खूप जास्त असते.
ब्लॅक बॉक्स कसा सापडतो याविषयी अधिक माहिती NTSB अधिकृत वेबसाइटवर वाचा.
धन्यवाद !!

पिंगबॅक: Rolex चे जनक हॅन्स विल्सडॉर्फ | मराठीत माहिती
पिंगबॅक: गावाची मतदार यादी मिळवा – फक्त 2 मिनिटांत - मराठी हेल्पलाइन
पिंगबॅक: AI मुळे नोकऱ्यांवर धोका? CEO काय म्हणतात?
पिंगबॅक: गावाची मतदार यादी मिळवा – फक्त 2 मिनिटांत
पिंगबॅक: डियोगो जोटा यांचा अपघात: एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना
https://t.me/s/iGaming_live/4860